मराठी (3 in 1 week | sorting by most liked)

*"आपण स्वतःहून फिट नाही राहिलो....,*
*तर...*
*कपडे स्वतःहून फिट होतात...*

😄😄😄😝🙏🏻

 
33
 
5 days
 
Just4u

एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले.
त्यांनी शाप दिला पुढची १२ वर्षे पाऊस पडणार नाही व तशी आकाशवाणी हि केली.

पृथ्वीवर सर्वदूर हाहाकार माजला.
सर्वजण हताश झाले.

१२ वर्षे पाऊस येणार नाही म्हणजे सर्व मणुष्य,प्राणी दुःकाळाने मरणार या विचाराने सर्व जण घाबरून गेले.

एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरे व कुटुंबाला पाणी द्यायचा.

थोड्याच दिवसात जंगलातील पाणी साठाही संपून गेला.

शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरू लागला असता त्याला एक विलक्षण दृश्य दिसले.

एक मोर आपल्या पिलांना नाचायला शिकवत हॊता.

त्या पिलांनी मोराला विचारले:-
जर १२ वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा?

मोर म्हणाला:-
आपण जर आता पासून नाचणे किंवा नाच शिकणे बंद केले,
तर जेंव्हा १२ वर्षांनी पाऊस पडू लागेल तेव्हा आपण सारे नाचणे विसरूनच गेलो असु.

शेतकरी हा संवाद ऐकून अवाक झाला.
तो धावतच घरी आला,
शेतीची अवजारे गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला.
आणि कोरडे शेत नांगरु लागला,
मुलांना शेतिची कामे शिकवू लागला.

मुले चकित होऊन बापाकडे पहात होती.
त्यांनी त्याला विचारले:-
बाबा जर १२ वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा?

शेतकरी म्हणाला:-
आपण शेतीची कामे शिकलो नाही किंवा करणे बंद केली,
तर १२ वर्षांनी पाऊस पडेल तोपर्यंत आपण सर्व कामे विसरून जाऊ.
आणि पुनः कमाला लागला.

इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला व शेतकऱ्याला काम करताना बघून अचंबित झाला.

तो एका ब्राम्हणाचे रूप घेऊन त्या शेतात आला आणि शेतकऱ्याला विचारले:-
तु आकाशवाणी ऐकली नाहीसका?

शेतकरी म्हणाला:-
होय ऐकली.
पण जर मी काम केलं नाही किंवा माझ्या मुलांना शेतीची कामे शिकवली नाही,
तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचे काहीच काम येणार नाही.
मग जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उपाशी राहतील.

इंद्र सुन्न झाला.
स्वर्गात आल्यावर विचार करु लागला कि,
जर मि १२ वर्षे पाऊस पाडला नाही तर मी सुद्धा पाऊस कसा पाडायचा ते विसरून जाईन.
मग सर्व सृष्टी करपुन जाईल,
जैव सृष्टी नष्ट होईल.

देवाने लगेचच विचार बदलला.
आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरुवात केली.

तात्पर्य:-
बाह्य परिस्थिती कशीही असो आपण न चुकता आपले कर्तव्य करीत राहायला हवं.

कठीण परिस्थिती मधेच आपल्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा असते.
नोटबंदी, मंदी किंवा चणचण असली तरी,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गटारी साजरी करायलाच हवी.

नाहितर गटारी कसी साजरी करतात तेच आपण विसरुन जाऊ.

🍻🍾🍻🍾🍻🍾🍻🍾🍻🍾🍻

 
33
 
3 days
 
Just4u

पार्लर मध्ये दोन्ही हातावर भरभरून मेहंदी लावल्यावर त्या महिलेला आठवले की ती एक्टिव्हा घेऊन एकटीच आली होती.

गाडीजवळ दोन्ही हात लांब करून उभ्या असलेल्या तिची ही घालमेल तिच्याच सोसायटीत राहणाऱ्या एकाने ओळखली व तिला तिच्या एक्टिव्हावर मागे बसवून घरी सोडले.

धन्यवाद वगैरे झाल्यावर त्याला आठवले की त्याची गाडी तिथेच बाजारात राहिली आणि बायको तर बाजूला भाजी घेत होती.

*#उठला_बाजार*
😜😂😂🤣🤣

 
22
 
5 days
 
Just4u
LOADING MORE...
ALL MESSAGES LOADED
BACK TO TOP