Message # 453862

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जवळ जवळ सगळ्या दोस्तांची लग्न उरकली,
आणि आता कट्टा बी सुना झालाय..

रात्री 10 नंतर कुणाचे बी फोन लागत नाहीत
ज्यांचे लागत्यात ते उचलत नाहीत..

आता हॉटेल वर गेल्यावर कुणी बी जास्त जेवत नाही
घरच जेवण खायला पळत्यात

पहिले सगळे गोवा अलिबाग लोणावळा लवासा अशी नाव घ्यायची

आता ते समदे तुळजापूर, शिर्डी, अंबेजोगाई, वणी, अशी नाव घ्यायलीत....

ज्यांच्या तोंडात एकादशीला पण हाडुक असायचं....

आता ती समदी सोमवार मंगळवार शनिवार पण पकडायला लागल्यात

बदलली रे सगळी बदलली

दुसर काही नाही ...............
.... बायकोचा धाक ..
😆😆😂😂😂😂😂😂

BACK TO TOP