Message # 441557

१२ वीतल्या दोन मुली पेपर देण्यासाठी चालल्या होत्या

सोनाली : - स्वाती तु अभ्यास का करत नाही?

स्वाती : - जाऊदे बाई! पास झाले तर परत १३, १४, १५वी चे पेपर, मग नोकरीवाला नवरा,

सोनली : - मग चांगल आहे की...

स्वाती : - काय चांगलं आहे?... नोकरी १२ तास आणि पगार १० - १२ हजार, मग दुसऱ्या शहरात राहायला जा, तिथे भाड्याने घर आणि त्यात अर्धा पगार घालावा, मग स्वतःचे घर पाहिजे तर कर्ज काढून हवेत ४ - ५व्या मजल्यावर बंद घरात रहा आणि त्या घराच्या कर्जाची परतफेड पुढचे १५-२० वर्ष करा, म्हणजे काटकसरीने संसार करा, आणि त्या टेन्शन नि आजाराला आमंत्रण, organic च्या नावाखाली ३ - ४पटीने सगळे खाण्याचे पैसे द्या... आणि तो नोकरी करणारा नोकरच ना... हिशोब लाव बाई कळेल तुला...
नापास झाले तर शेतकरी नवरा कष्ट आहेत पण तो खरा मालक, पैसा थोडा कमी जास्त पण tax नाही, Organic पिकवणार आणि तेच खाणार म्हणजे, आजाराचे टेन्शन नाही... आणि नवरा २४ तास आपल्या सोबत राहणार..

सोनाली : - मी पण नापासचं होते

😊😊😀😀😀

BACK TO TOP