Message # 437715

कंपनीच्या वार्षिक महोत्सवानिमीत्त क्रोकोडाईल फार्मवर फॅमिली ट्रिप गेली असता सनकी बाॅसने एक स्पर्धा लावली. "शेकडो मगरी असलेल्या त्या तळ्यात जो कोणी एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सुरक्षित पोहून जाईल त्याला 50 लाखाचे बक्षीस मिळेल. आणि जर का यात तो मगरींकडून मारला गेला तरी त्याच्या वारसाला 10 लाख मिळतील".

तिथे आलेल्या स्टाफपैकी एकही माणूस हे आव्हान स्विकारायला तयार नव्हता.

पण काही वेळेनंतर अचानक एकाने तळ्यात उडी मारली. त्याला पकडायला आलेल्या मगरींचा जीवघेणा पाठलाग पाहून जिवाच्या आकांताने पोहून कसेबसे तळ्याचे दुसरे टोक गाठलेच आणि शर्त जिंकला.

भीतीमुळे थरथर कांपत थोडावेळ किना-यावर बसल्यावर तो एकदम रागाने ओरडला,
"कोणी मला मागून तळ्यात ढकललं होतं?".

बघतो तर काय, ज्या व्यक्तीने त्याला तळ्यात ढकलल्यामुळे तो जिंकला होता,ती खुद्द त्याचीच पत्नी होती.

आणि तेव्हापासूनच ही म्हण अस्तित्वात आली 👇👇👇

*"Behind every successful man...there is a woman"*
!!!😜🤣

BACK TO TOP